परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे व तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये, या उद्देशाने परंडा येथे दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या वतीने हा कॅम्प पार पाडण्यात आला.
या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग , मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण 45 दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर डॉ.ज्योती कल्याणी, डॉ. आयुश शिंदे, डॉ. खंडागळे यांनी कामकाज पाहिले. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योगसमूहाचे जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने, सरपंच कार्ला संतोष भुजे, सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ सरपने, शिक्षण विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कामकाज पाहणारे कर्मचारी हाजगुडे, जाधव मॅडम, बापू खताळ, डॉ. शेटे, अमोल बांबुरकर यांनी सहकार्य केले.