तुळजापूर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रिमियर लीग तुळजापूर क्रिकेट स्पर्धचे उदघाटन मंगळवार दि.25 फेब्रुवारी रोजी सांयकाळी युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अँड. अशिष सोनटक्के, उपसभापती सुहास गायकवाड, सचिन पाटील, संतोष बोबडे, संयोजक विजय गंगणे, आनंद कंदले सह अन्य मान्यवरांचा उपस्थीतीत प्रंचड फटाक्याच्या आतिष बाजीत हाडको मैदानावर झाले.
यावेळी यावेळी शांताराम पेंदे, विशाल रोचकरी, रामचंद्र रोचकरी, नरेश अमृतराव, संतोष पवार, निलेश रोचकरी, पंडीत जगदाळे, शिवाजी बोदले, विजय कंदले, रत्नदीप भोसले, संतोष कदम,बालाजी रोचकरी, आनंत रसाळ, विकास चुंगे सह मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी तुळजापूर क्रिकेट प्रेमीचा वतीने प्रास्तविक करताना शहरवासिय संयोजक माजी सभापती विजय गंगणे म्हणाले कि, या स्पर्धचा क्रिकेटप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक माजी सभापती युवा नेते यांनी केले. या स्पर्धेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 16 संघ सहभागी होणार आहेत. तब्बल अडीच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
असणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातर्फे अडीच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील
यांच्याकडून प्रमुख पारितोषिके आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा वतीने अडीच लाखांचे प्रथम पारितोषिक तर युवक नेते विनोद गंगणे यांच्या वतीने दीड लाखांचे द्वितीय पारितोषिक असणार आहे. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व रुग्णकल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्याकडून 81 हजार रुपयांचे अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक असणार आहे. याशिवाय अनेक वैयक्तिक बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेचे यूट्यूबवरून लाइव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, वॉटर प्युरिफायर, एलईडी टीव्ही आदी बक्षिसांची मेजवानी असणार
आहे.