तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजेी चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर परीसरातील वस्तीतील पालावरची शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

आपल्या गरीबीतुन वेडंवाकडं शिक्षण घेत असलेल्या लहान बाळ विद्यार्थी ज्यांच्या नशीबात अंगणवाडी, बालवाडी नाही यांच्या वस्तीमध्ये जाऊन संघपरीवार अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. त्यांना एक छोटीशी मदत म्हणून शालेय साहीत्य उजळणी पुस्तक,वह्या,पेन,खाऊ वाटप केले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाबा घोंगते, सोनवणे, मेजर उळेकर, भाजपा सरचिटणीस सागर पारडे, उमेश शेंडगे,विलास पारडे, अभिषेक पवार उपस्थित होते.

 
Top