धाराशिव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित , रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांना महाराष्ट्र राज्य उच्चतंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट युवती प्रदेशाध्यक्ष कु. सक्षणा सलगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संभाजी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश सचिव सौ संगीता काळे , आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथील वाणिज्य विभाग  प्रमुख प्रा.अरुणा पोटे,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती जिल्हाध्यक्ष श्वेता दुरुगकर , ॲड भाग्यश्री रणखांब ,यांचे शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील डॉ.अरविंद हंगरेकर , डॉ. मारुती लोंढे आदी सह गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.  सत्काराबद्दल प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top