धाराशिव (प्रतिनिधी) - येथील धाराशिव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित धाराशिव प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ स्वयंशासन दिन साजरा करून दि.१७ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
धाराशिव प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक या जबाबदाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी चोखपणे पार पाडल्या. त्यांनी शाळा भरविण्यापासून सुटेपर्यंत वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, हिंदी, विज्ञान, इतिहास भूगोल व नागरिक शास्त्राचे याचे धडे दिले. या माध्यमातून त्यांनी दिवसभर सर्व वर्ग व्यवस्थितरित्या संभाळले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी प्रशालेचे सचिव दिलीप गणेश, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, मुख्याध्यापक पंडित जाधव व शिक्षकांनी पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.