मुरुम (प्रतिनीधी)-  महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्रातील 50 महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून प्रमाणित करण्यात आले.महाविद्यालयाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र आणि निधी तसेच 2024-25 चा श्री छत्रपती संभाजीनगर  विभागातील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना  प्रफुल्ल पाठक, सेक्रेटरी पॉवर सेक्टर स्किल दिल्ली,  बाबासाहेब वाघमारे लायझनिंग ऑफिसर ऊर्जा विभाग मंत्रालय, राज देशमुख संस्थापक वुई फाउंडेशन, सिंघानिया कंपनीचे सीआयओ शंकर जाधव, प्रीआयएस सेंटर मुंबई संचालिका भावना पाटोळे, पोलीस आयुक्त निलेश घटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहामध्ये आयोजित करिअर कट्टा एकदिवसीय कार्यशाळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमात या कार्यशाळेसाठी व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी करिअर कट्टा प्रमुख  यशवंत शितोळे, आवाजाची कार्यशाळाचे सोनाली लोहार, इमोशनल इंटेलिजन्सच्या  मिथिला दळवी, प्राचार्य प्रज्ञा प्रभू, प्राचार्य अतुल साळुंखे,  डॉ दीपा वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल आणि डॉक्टर अस्वले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे, जनार्दन साठे, पद्माकरराव हराळकर, डॉक्टर सुभाष वाघमोडे, डॉ विलास इंगळे, डॉ पद्माकर पिटले, प्रा जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा शैलेश महामुनी, राजकुमार सोनवणे, नितीन कोराळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top