परंडा (प्रतिनिधी) - येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या सचिव तथा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शिवमती आशाताई मोरजकर यांनी मी रमाई बोलते या एकपात्री अभिनयात उत्कृष्ट भूमिका बजावली त्यामुळे त्यांचा ज्येष्ठ साहित्यिक गडंगणकार तु. दा.गंगावणे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के व मराठा सेवा संघाचे परंडा तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर यांच्या उपस्थितीमध्ये साडी चोळी  देऊन यथार्थ सन्मान करण्यात आला.

शिवमती आशाताई मोरजकर या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये समाज जागृतीचे उल्लेखनीय काम करतात.त्यांनी परंडा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये माता रमाई राष्ट्रमाता जिजाऊ माता सावित्रीअहिल्यादेवी होळकर यांचे विचार आत्मसात करून ते विचार घेऊन समाजामध्ये प्रबोधनाचे बहुमूल्य असे योगदान देत आहेत.ज्या महापुरुषांनी आपल्या योगदानाने हा महाराष्ट्र घडविला त्यांच्या विचाराने व त्यांच्या प्रेरणेने त्यां संस्थेच्या अंतर्गत व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून समाजप्रबोधन परिवर्तनाचे  काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत . त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या दि. 7 फेब्रुवारी रोजी रमाई जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी रमाई बोलते या एकपात्री नाटकाचे सादरीकरण एकाच वेळी दोन ठिकाणी करून विद्यार्थ्यांना व समाजातील घटकांना रमाई या बाबासाहेबांच्या पत्नी यांच्या कार्याबद्दलचा व त्यांच्या त्यागाबद्दलचा हुबेहूब अभिनय करून माता रमाई चे बाबासाहेबांच्या जीवनातील कार्य दाखवून दिले.

 
Top