धाराशिव (प्रतिनिधी)- येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नुतन अधिष्ठाता डॉ. शैलेन्द्रसिंह चौहान यांचा धाराशिव महाराणा प्रतीष्ठीतच्या वतीने गुरुवारी त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेशसिंह परदेशी, उपाध्यक्ष गोविंदसिंह राजपूत, सचीव कृपालसिंह ठाकूर, शिवरतनसिंह तोवर, किशोरसिंह तिवारी, उमरग्याचे रणजितसिंह ठाकूर, अमरसिंह चौहान, देवीसिंह राजपूत अतुल सिंह बायसआदी उपस्थित होते.