तुळजापूर  (प्रतिनिधी)-   येथे धाराशिव लोकसभा मतदार संघ अंतर्गत राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शन खाली युवा नेते विनोद गंगणे यांच्या संयोजनाने डीपीएल क्रिकेट डे नाईट क्रिकेट स्पर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे मिञ मंडळ तर्फ 25फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 या कालावधीत आयोजित केली आहे. खेळाडुंचा अँक्शन सोहळा व जर्सी अनावरण सोहळा शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी हाँटेल दसरा ऐक्झीकेट्युव येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.

सदरील स्पर्धा लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघ अशा दोन गटात ठेवली आहे. लोकसभा मतदार संघ स्पर्धतील विजेत्या संघास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तर्फ 2 लाख 50 हजार, उपविजेत्या संघास युवा नेते विनोद गंगणे यांच्या तर्फ 1 लाख 50 हजार, तृतीय संघास सचिन रोचकरी  तर्फ 81 हजार, चतुर्थ संघास आनंद कंदले तर्फ 51 हजार असे रोख रक्कम व ट्राँफी  पारितोषिक देवुन गौरविण्यात येणार आहे. 

विधानसभा मतदार संघ विजेत्या संघास कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सचिन पाटील तर्फ 81 हजार रुपये, उपविजेत्या संघास कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती अँड अशिष सोनटक्के वतीने 51 हजार रुपये, तृतीय संघास संतोष बोबडे तर्फ 31 हजार रुपये, चतुर्थ संघास  कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुहास गायकवाड तर्फ 25 हजार रुपये रोख रक्कमेसह ट्राँफी देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. उपस्थितीत प्रेक्षकांना लकी ड्राँ माध्यमातून किंमतवान वस्तु भेट देणार आहे. तरी या स्पर्धत जिल्हा व तालुक्यातील क्रिकेट संघानी सहभाग नोंदवावा. असे आवाहन संयोजक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे मिञ मंडळाने केले आहे.

 
Top