धाराशिव (प्रतिनिधी)- विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 शिवजन्मोत्सवानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव आणि धाराशिव डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशनच्या वतीने आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डायट कॉलेज धाराशिव येथील मैदानावर जिल्हास्तरीय धनुर्विद्या (तिरंदाजी) स्पर्धा करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील बरेच मुले व मुली स्पर्धक सहभागी झाले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हळनारे यांचे यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक दयानंद जेटनुरे आणि प्राध्यापक अंजली सूर्यवंशी यांनी अध्यक्षपद भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रजीत जाधव, प्रवीण गडदे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पंच म्हणून कैलास लांडगे आणि यशोदीप कदम यांनी भूमिका पार पाडली. या कार्यक्रमास शुभांगी दळवी राज्य क्रीडा मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले. या तिरंदाजी स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील एकूण 67 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्रिया गडकर, परीक्षीत वाघमारे, महेश्वर बळे, सर्वेश आंबेकर, अर्जुन बागल, अवनी घोडके, स्वराज्य जाधव, मल्हार काकडे, स्वराज काकडे, रुद्र बागल, परिक्षीत गडकर, योगीराज पवार, पवन जमादार, अभिनव जानराव, समर्थ चव्हाण इत्यादी स्पर्धकांनी विविध प्रकारामध्ये क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते यशवंत स्पर्धकांचे बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे अध्यक्ष गौरव बागल, शहराध्यक्ष हनुमंत यादव, तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांचेसह समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर उपाध्यक्ष आकाश भोसले यांनी केले. तर सूत्रसंचलन सिद्धेश्वर मते यांनी केले. तर आभार प्रदर्शन समितीचे उपाध्यक्ष अमोल सिरसट यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा प्रेमींचा मोठा उत्साह दिसून आला.


 
Top