धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या सन्मान समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा हा उपक्रम राबवण्यात येतो.या करिअर कट्टा उपक्रमाचे जिल्हा प्राचार्य प्रवर्तक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या विभागाच्या वतीने त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यापूर्वी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाच्या विविध महत्त्वपूर्ण समित्यांवर भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर परिसर धाराशिव चे संचालक, धाराशिव जिल्ह्याच्या प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक,तर विद्यापीठाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांवर प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.
सध्या ते धाराशिव शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य ,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा अजीव सेवक आणि जनता सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत. या त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्चतंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र त्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमाचे सर्व पदाधिकारी यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राज्यस्तरीय पुरस्कार गौरविण्यात येणार आहे. याबद्दल प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.