तुळजापूर (प्रतिनिधी)-  शिक्षकांच्या व्यक्तीत्वामधुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी केले. ते  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे एच.एस.सी व्होकेशनल विभाग प्रमुख प्रा धनंजय लोंढे 32 वर्षाच्या प्रदिर्घ सेवे नंतर सेवानिवृत्त झाले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रा. लोंढे यांचा सपत्नीक सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवा गौरव समारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. रमेश दापके बोलत होते. 

ते म्हणाले की, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा धनंजय लोंढे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले व विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत,माणसाच्या कर्तव्यात खरेपणा असला की तो खरेपणा निश्चितच इतरांना प्रभावित करत असतो अगदी त्याच पद्धतीने लोंढे यांनी सर्वांना प्रभावित केल्याचे दिसून येते. 

यावेळी प्रमुख पाहुणे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, तुळजाभवानी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक म्हणून गेली 50 वर्ष एवढा मोठा प्रवास प्रा. धनंजय लोंढे यांनी तुळजाभवानी शिक्षण संकुलात व्यथित केला. माणसाच्या जीवनात अनेक चढ उतार येत असतात. संकटे येत असतात यातुन माणूस ताउन सुलाखून जेंव्हा बाहेर येतो तेव्हा त्या माणसाला कोणतीही परिस्थिती हरवू शकत नाही. 

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील उपस्थितांना संदेश दिला ते म्हणाले की, प्रा धनंजय लोंढे यांच्या सारखे सच्चे गुरुदेव कार्यकर्ते ज्यांची नेहमी तुळजाभवानी महाविद्यालयाला आवश्यकता भासणार आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी केले. यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य अप्पासाहेब पाटील, सज्जनराव साळुंके यांच्या सह सर्व आजी, माजी प्राध्यापक, प्राचार्य सर्व मित्र परिवार,सर्व आप्तेष्ट, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ आनंद मुळे,प्रा वनिता बाबर यांनी केले तर आभार प्रा डॉ नेताजी काळे यांनी मानले.

 
Top