धाराशिव (प्रतिनिधी) - माता रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त क्रांतीशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांच्या प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रमात शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांनी भिमराव होता म्हणून ...तुझ्या बोटाला लागली शाय...आदींसह विविध क्रांतिकारक व प्रेरणादायी गीते सादर करीत माता रमाई आंबेडकर यांना प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे हजारोंच्या साक्षीने दि.7 फेब्रुवारी रोजी अभिवादन केले.
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील रमाई फाउंडेशनच्यावतीने क्रांती शाहीर शितलताई साठे व सचिन माळी यांच्या प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन लेडीज क्लबच्या मैदानावर करण्यात आले होते. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भन्ते पय्यानंद महाथेरो, रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, महेंद्र धुरगूडे, डॉ. स्मिता गवळी - सरोदे, रुक्मिणी मंजुळे, पानसे, ऍड. निलेश प्रधान, ऍड. जिनत प्रधान, जयाताई बनसोडे, विक्रम पाटील, अमरसिंह देशमुख, विष्णू इंगळे, मधुकर जानराव, अरुण बनसोडे, दिलीप वाघमारे, यु.व्ही. माने, प्रा. राम चंदनशिवे, कुणाल निंबाळकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमरशक्ती चिलवंत, अमोल वाघमारे, आप्पासाहेब सिरसाठ, विनोद जाधव, शिलरत्न भालशंकर, राहुल वाघमारे, सोमनाथ गायकवाड, मुकेश मोटे, संदीप अंकुशराव, गुलाब वाघमारे, उदयराज बनसोडे, अमोल अंकुशराव, नितीन लांडगे, लक्ष्मण सोनवणे, मिलिंद वाघमारे, सिद्धोधन शिंगाडे, सुशांत जाणराव, सम्यक चिलवंत, सखा इंगळे, अक्षय शिंगाडे, तेजस गायकवाड, यश कांबळे,अमोल गायकवाड, अनुज झेंडे, प्रदीप विधाते, हर्षद बनसोडे, शौर्य गायकवाड आदींसह इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.