भूम (प्रतिनिधी)- सर्व धर्म समभाव हे ब्रीद वाक्य घेऊन चक्रवर्ती सम्राट अशोक रिक्षा चालक-मालक असोसिएशनची स्थापना केली आहे.  या असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरविंद बगाडे यांची तर उपाध्यक्षपदी धम्मदीप लगाडे यांची निवड केली आहे. लवकरच शहराच्या प्रमुख ठिकाणी रिक्षा थांबा करण्याचे नियोजन केल आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारीकरण विचारात घेता शहराच्या चारही दिशेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची घरे ,कॉलनी झालेले आहेत,  या भागात व स्थानक येथून , आठवडी बाजार मार्केट मधून जाणे येणे गैरसोईचे होत आहे. अशा नागरिकांना ऑटो रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे, त्याप्रमाणे ऑटो रिक्षांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशा या ग्राहकांना रिक्षा सेवा सर्व धर्म समभाव या ब्रीद वाक्याला स्मरून चांगली सेवा देता यावी, समाधानकारक सेवा देता यावी, या उद्देशाने रिक्षा चालक मालकाने चक्रवर्ती सम्राट अशोक रिक्षा चालक-मालक असोसिएशनची स्थापना केली आहे.

या असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरविंद बगाडे, उपाध्यक्ष धम्मदीप लगाडे, सचिव राहुल पायाळ कोषाध्यक्ष किशोर मिटकर सदस्य हनुमंत घुले, भारत मिटकर, बाळासाहेब माने, सचिन वडेकर, बाबा ओव्हाळ यांचा पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. लवकरच ग्राहकांना, नागरिकांना सुरळीत रिक्षा सेवा मिळावी. सर्व रिक्षा चालकांना रोजगार देखील मिळावा यासाठी शिस्त म्हणून शहराच्या वरदळीच्या प्रमुख गोलाई चौक या ठिकाणी, रस्त्याच्या कडेला, इतर वाहनांना, नागरिकांना अडथळा होणार नाही अशा अनुषंगाने रिक्षा पार्किंगची सोय व्यवस्था केली जात आहे, रिक्षा स्टॉप केला जात आहे. याचं लवकरच सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

असोसिएशनच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांना देखील प्रशासनाकडून सहकार्य योगदान मिळावं यासाठी नोंदणीकृत असोसिएशनच्यावतीने सर्वांनी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी , नगर पालिका मुख्याधिकारी तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील लेखी स्वरूपात निवेदन देऊन सहकार्याची अपेक्षा केली आहे.

 
Top