धाराशिव (प्रतिनिधी)- अहमदिया मुस्लिम जमाअत उस्मानाबादच्या युवा प्रतिष्ठान संस्था मजलिस खुद्दाम-उल-अहमदिया अंतर्गत खिदमत-ए-खल्क  विभागाने 16 फेब्रुवारी 2025 रोजी मासिक सामाजिक सेवा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 100 हून अधिक रुग्णांना, विशेषतः पुरुष, महिला सर्जरी आणि इतर वॉर्डांतील रुग्णांना, फळांचे पॅकेट वितरित करण्यात आले.

अहमदिया मुस्लिम जमाअत इस्लामच्या मानवसेवेच्या शिकवणींना अनुसरून समाजोपयोगी कार्य करत असून, गरजूंसाठी नियमित उपक्रम राबवत आहे. रक्तदान, अन्नदान, तसेच थंडीच्या काळात गरजूंना गरम कपडे देण्यासारख्या सेवा वर्षभर चालू असतात. या उपक्रमातही जमाअतच्या सदस्यांनी निःस्वार्थ वृत्तीने सहभाग घेतला.

या महिन्याच्या उपक्रमांतर्गत मजलिस खुद्दाम-उल-अहमदिया सदस्यांनी काळजीपूर्वक तयार केलेल्या फळांच्या पाकिटांचे वितरण केले. यामागील उद्दिष्ट रुग्णांच्या आरोग्य सुधारणा आणि पुनर्वसन प्रक्रियेत हातभार लावणे हे होते.रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी अहमदिया मुस्लिम जमाअतचे शहर उपाध्यक्ष अब्दुस समद, खुद्दाम-उल-अहमदिया शहराध्यक्ष राग़ेब अलीम, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश रानबा वाघमारे , सचिन चौधरी सहसचिव मतदार जनजागरण समिती धाराशिव, चिटणीस मानव सेवा सजील अहमद, डॉ. रमेश सर, सिस्टर शीतल, सालाहुद्दीन शेख,अब्दुल अलीम, अब्दुल नईम, नदीम अहमद, मुताहिर अहमद,आदिल अहमद, शफीक अहमद, मंजूम अहमद आणि इतर डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी सदस्य उपस्थित होते. अहमदिया मुस्लिम जमाअत देशसेवा आणि मानवतेची सेवा अविरतपणे करत आहे आणि पुढेही करत राहील.

 
Top