धाराशिव  (प्रतिनिधी) - आमदार सुरेश धस यांचा स्वीय सहाय्यक अर्थात पीए असल्याचे भासवत आशिष विसाळ या भामट्याने अनेकांना लुबाडले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमदार सुरेश धस यांच्या नावाचे लेटर वापरून त्यावर तक्रार करीत अधिकाऱ्यांना विधिमंडळात प्रश्न विचारून तुमची चौकशी लावीन असे धमकावत कोट्यावधी रुपयांची खंडणीरुपी माया गोळा केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडे आलेल्या अर्जामध्ये आपण जातीने लक्ष देऊन कारवाई केल्याचे आढळून येत आहे. त्याची आपण खातरजमा केली असती तर हा इतका निर्ढावला नसता असे नमूद करीत विसाळ यांच्या कारणांची म्हणजेच सर्वच दिलेल्या अर्जांची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुजित वैजिनाथ ओव्हाळ यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे  दि.4 फेब्रुवारी रोजी केली आहे. त्यामुळे भामटा विसाळच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की, आशिष विसाळ हा तथाकतीत भामटा आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचे भासवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची तक्रार करीत होता. त्यामधील बहुतांश प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन कारवाई केल्याचे आढळून येते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कधीतरी या पी ए ची खातरजमा केली असती तर हा इतका निर्ढावला नसता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे अर्ज पाहिले तर आ सुरेश धस यांच्या लेटरहेड वापरून हा अधिकाऱ्यांना भीती घालत होता. विशेष म्हणजे त्याने बऱ्याच वेळा राज्यमंत्री असा उल्लेख असलेल्या लेटरहेड वापरलेले आहेत. आ धस हे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी राज्यमंत्री होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कोणत्याही पत्रावर जावा क्रमांक दिसून येत नाही. त्यामुळे विसाळने दिलेल्या सर्व अर्जांची आ धस यांना संपर्क साधून त्या पत्रांची खातरजमा करावी. तसेच त्या भामट्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ओव्हाळ यांनी केली आहे.

 
Top