धाराशिव (प्रतिनिधी) - फक्त पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न रथ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच अर्थात विमा पॉलिसीचे वितरण राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी दिली आहे.
लढा पत्रकारितेचा हे ब्रीद घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना जागतिक स्तरावर कार्यरत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना अपघात विमा रकमेचे सुरक्षा कवच मिळावे यासाठी अपघात विमा पॉलिसी उतरविण्यात येणार असून हे सलग तिसऱ्या वर्षी आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री कैलास पाटील, राणाजगजितसिंह पाटील, प्रवीण स्वामी तसेच जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, युवासेनेचे राज्य कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, राज्य समन्वयक तथा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस चेतन कात्रे व राज्य कार्यवाह अमरचंदे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पत्रकार व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जुबेर शेख, रेडिओ विंगचे रमेश पेठे, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ कांबळे, शिवशंकर तिरगुळे, सरचिटणीस आकाश नरोटे, कोषाध्यक्ष रवींद्र लोमटे, कार्यवाहक दयानंद काळुंके, जसवंतसिंह बायस, संघटक रामराजे जगताप, अमोल पाटील, रवींद्र तांबे, काकासाहेब कांबळे, प्रवक्ता मनोज जाधव, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख सलीम पठाण, तालुकाध्यक्ष रामेश्वर शिंदे (धाराशिव), रणजीत गवळी (कळंब), विलास गपाट (वाशी), चंद्रमणी गायकवाड (भूम), प्रमोद वेदपाठक (परंडा), ज्ञानेश्वर वाघमारे (तुळजापूर), गिरीश भगत (लोहारा) व बालाजी माणिकवार (उमरगा) यांनी केले आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील जुन्या बीएसएनएल ऑफिस समोरील आर्यन फंक्शन हॉल येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.