तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संविधान गौरव महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. ते म्हणाले की 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली,जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली हा दिवस महत्वाचा आहे. कारण या दिवशी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना स्वीकारण्यात आली जी भारताच्या लोकशाहीच्या व्यवस्थेचा कणा आहे.  स्थापनेपासून गेल्या 75 वर्षात, राज्यघटना देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम करत आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण या वेळी साक्षीदार होत असताना संविधानाच्या प्रती आपल्याला जागृत होणं काळाची गरज आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाला आणि त्याच्या जीवनाला विशेष आकार दिला. आपले मूलभूत हक्क,कर्तव्य या बाबत जाणिव जागृती होण्यासाठी महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भारतीय संविधानाच्या विषयी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, जनजागृती अभियान, प्रश्न मंजुषा,भित्तिपत्रिका अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही डॉ. पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ आबासाहेब गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा डॉ मंत्री आर. आडे, डॉ बापू पवार,प्रा अमोल भोयटे,प्रा निलेश एकदंते, प्रा जी.व्ही. बाविस्कर, प्रा सुदर्शन गुरव,प्रा वसावे,प्रा वागदकर यांच्या सह सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.बी.जे. कुकडे यांनी मानले.

 
Top