नळदुर्ग (प्रतिनिधी)-  सदगुरू श्री सेवालाल महाराज यांची 286 वी  सामुदायिक भव्य जयंती महोत्सव नळदुर्ग शहरात शनिवार दि.15 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार आहे.

शनिवारी रोजी सकाळी 11 वाजता कै.वसंतराव नाईक (महामार्ग गोलाई) चौकात श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत.यावेळी ध्वजारोहण करुन प्रतिमेचे पुजन ,  भोगचा कार्यक्रम होईल. त्यानंतर शहरातील ऐतिहासिक किल्ला गेट येथुन बसस्थानक पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नळदुर्ग येथिल सदगुरु श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीने दिली असुन या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जयंती महोत्सव कार्यक्रमासाठी  सदगुरू श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष रवि  महाराज राठोड, उपाध्यक्ष-महेश चव्हाण,  अकाश जाधव ,सचिव- बालाजी राठोड ,सहसचिव- सचिन राठोड ,कोषाध्यक्ष- दत्ता राठोड, सहकोषाध्यक्ष प्रभाकर जाधव, मिरवणूक प्रमुख- कैलास चव्हाण,सचिन पवार, दिलीप राठोड, प्रवीण चव्हाण आदीनी पुढाकार घेत आहे.

 
Top