धाराशिव (प्रतिनिधी) - संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत उपाध्यक्ष,प्रा.डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांचा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मतांनी दणदणीत विजय झाला.त्याबद्दल धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने प्रा.डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांचे लातूर येथील निवासस्थानी दृष्यकला प्रमुख,संस्कार भारती,देवगिरी प्रांत पदाधिकारी शेषनाथ वाघ,डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांचे शिष्य तथा संस्कार भारतीचे धाराशिव जिल्हाकार्याध्यक्ष  अनिल ढगे  धाराशिव जिल्हा संस्कार भारतीचे सचिव प्रभाकर चोराखळीकर यांच्या हस्ते सौ. शुभांगी सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रसंगी लातूर येथील संस्कार भारतीचे धनंजयजी देशपांडे , धन्वंतर देशपांडे उपस्थित होते.

 
Top