धाराशिव (प्रतिनिधी)-माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस  यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार अजमेरा यांनी निवडीचे पत्र चाऊस यांना दिले आहे. या निवडीचे आरटीआय कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम ही संस्था करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ही संस्था माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करत आहे.  या संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड करुन अजमेरा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडीनंतर चाऊस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीनकुमार अजमेरा, जमील सय्यद, दत्ता मुळे, जाकिर शेख व संस्थेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
Top