कळंब (प्रतिनिधी)-इनरव्हिल क्लब कळंब च्या पुढाकाराने कळंब येथील 9ते26वर्षे वयोगटातील विविध शालेय व महाविद्यालयीन मुली व युवतींसाठी  ह्युमन पॅपीलोमा व्हायरस ( एच पी व्ही) लसीकरण अभियान सुरू करण्यात आले असून त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, बाल आरोग्य परिषद व स्त्री आरोग्य परिषद यांचे सहकार्य लाभले आहे. 

6 फेब्रुवारी 2025 पासुन लसीकरण व जनजागृती अभियाना अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रशाला येथुन अभियानाची सुरूवात होत आहे.  शिवाजी महाविद्यालय, ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, समर्थ प्राथमिक शाळा, शहीद भगतसिंग विद्यानिकेतन , श्रीमती सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्याभवन हायस्कूल, जिजामाता प्राथमिक शाळा,जि.प.उर्दू प्रश्नाला, शारदा इंग्लिश स्कूल,मॉडेल इंग्लिश स्कूल, कॅनव्हास इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन 17 फेब्रुवारी पर्यंत सर्व मुली व पालकांना या लसी विषयी जनजागृती अभियानात सविस्तर माहिती देऊन  लाभार्थी मुलींची नोंदणी  करण्यात आली शिवजयंतीनिमित्त एच पी व्ही लसीकरण  जनजागृती अभियानात व कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमत कळंबमधील  9ते26वर्षे वयोगटातील  मुलामुलींना दि.25-26 फेब्रुवारी रोजी विजया नर्सिंग होम (डॉ.लोंढे यांचा दवाखाना) कळंब येथे सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी 2वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टर कडून लस दिली गेली  त्यामध्ये डॉ . रामकृष्ण लोंढे,डॉ वर्षा कस्तुरकर, डॉ दिपाली लोंढे, डॉ.प्रियंका आडमुठे, डॉ.शितल कुंकूलोळ, डॉ.शोभा पाटील  डॉ.शिल्पा डेंगळे डॉ.प्रियंका जाधवर, डॉ .मेघा आवटे, डॉ . अभिजित लोंढे कडून लसीकरणचा पहिल्या डोस देण्यात आला त्यामध्ये कळंबमधील विविध शाळा व महाविद्यालयातील एकूण 50मुला-मुलींनी त्याचा लाभ घेतला.  पुढील दुसरा डोस दि.25एप्रिल व  तिसरा डोस दि.25 ऑगस्ट घ्यायचा आहे.तसेच ज्यांना लसीकरण करून घ्यायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे दि.8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना लसीकरण केले जाईल.

हा  अनोख्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हिल क्लब कळंब च्या अध्यक्षा सौ प्रतिभा बाळकृष्ण भवर( गांगर्डे) सेक्रेटरी डॉ.प्रियंका आडमुठे,प्रोजेक्ट चेअरमन डॉ वर्षा कस्तुरकर , डॉ .. दिपाली लोंढे,डॉ.मिनाक्षी भवर(शिंदे), डॉ वर्षा जाधव,सौ.संगिता घुले,सौ.राजश्री देशमुख,सौ.वेदिका जाधवर,सौ.दिपाली कुलकर्णी व सर्व इनरव्हिल क्लब मधील सर्व मेंबर्संनी सहकार्य केले.

ही बाब जरी खर्चिक असली तरी पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्याचा विचार करून  उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल इनरव्हिल क्लब कळंब च्या अध्यक्षा सौ प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) यांनी लाभार्थींना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले व अभियानात सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.

 
Top