भूम (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हाधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत भूम तालुक्याने विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात आपली छाप उमटवली. तालुका स्तरावर सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरासाठी निवड झालेल्या रविकिरण भास्कर भोजने यांनी आपल्या गायन कौशल्याने सर्वांना मंत्रमुग्ध करत प्रथम क्रमांक पटकवला.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ व परीक्षक मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन रविकिरण भोजने यांचा गौरव करण्यात आला. तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुराया यशामुळे भूम तालुक्याची मान उंचावली आहे. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, रविकिरण भोजने यांनी आपल्या गायनाच्या अद्वितीय प्रतिभेने तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या विजयामुळे भूम तालुक्याचा गौरव वाढला असून, हा प्रेरणादायी क्षण आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भोजने यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

 
Top