धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात दि.25/10/2024 रोजी राहुल राजाभाऊ यादव वय 37 वर्ष व्यवसाय मजुरी रा.विठठल रुक्मिणी मंदीराजवळ ओमनगर ता.जि धाराशिव हे घरास कुलुप लावुन कामाला गेले असता सकाळी 09 ते 11.00 वा. दरम्यान अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे कडीकोंडा तोडुन घरातील कपाटात ठेवलेले सोन्यांचे कानातील फुले जुने वापरते किंमत अंदाजे 12000/- रूपये तसेच रोख रक्कम 4000/-रूपये असे एकुण 16000/- असे चोरी करुन नेले वगैरे मजकुराचा फियार्दा जबाब वरुन पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे दि.25/10/2024 रोजी अज्ञात चोरटया विरुध्द पोस्टे धाराशि शहर गुरनं 451/24 कलम 331 (3) 305 (अ) बी.एन. एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव उपविभाग धाराशिव स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक धाराशिव शहर पोलीस ठाणे शकील शेख यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक देविदास हावळे, पोहेकॉ/1190 पठाण, पोकॉ/1848 जमादार, मपोकॉ/1673 देशमुख यांना मिळाल्या गुप्त बातमी वरुन तसेच सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी, तांत्रिक विश्लेषणाव्दारे सदरचा गुन्हा हा आरोपी सौरभ हरीदास काळे रा.वाकी ता. आष्टी जिल्हा बीड यांने केल्याचे निष्पण करुन त्यास वाकी ता. आष्टी जिल्हा बीड येथुन ताब्यात घेडुन त्याचेकडे विचारपुस केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचेकडुन गुन्हयातील गेला माल सोन्याचे कर्ण फुले 7,000/- रुपये किंमतीचे, 4000/- रुपये रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल जिचा पासिंग एम.एच 23 बि.जे. 8112 किंमत 1,00,000/- रुपये असा एकुण 1,11,000/-रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीताकडे अधिक तपास सुरु असुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली आहे.


 
Top