तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील होनाळा येथे .एस.डब्ल्यू. एनर्जी आणि जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयोजित आरोग्य शिबिरात 126 ग्रामीण . भागातील रुग्णांन वर मोफत तपासणी करण्यात आली.
शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत होनाळा येथे जे.एस.डब्ल्यू. एनर्जी आणि जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जे. एस. डब्ल्यू. संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने 126 पेक्षा अधिक ग्रामस्थांनी मोफत बीपी शुगर तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, नेत्र तपासणीद्वारे गरजू ग्रामस्थांना मोफत चष्मे निश्चित करणे, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मोफत औषधोपचार इ. सेवांचा मोफत लाभ घेतला. यामध्ये गावातील तरुण, जेष्ठ नागरिक, महिला, मुले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तज्ञ महिला डॉक्टर यांनी किशोरवयीन मुली व महिला यांना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन केले. सरपंच कोरे व ग्रामस्थांनी सदर शिबिराबाबत आणि मिळालेल्या सेवा आणि उपचारांबाबत समाधान व आभार व्यक्त केले.