तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील घाटशिळ वाहनतळात अचानक कार  ला आग लागल्याने कार पेट घेतली असता तिथे असणाऱ्या मडळीनी  वेळीच पाणी टाकुन   कार मध्ये लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला .

शहरातील घाटशिळ वाहनतळात श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आलेल्या भाविकांची वाहने मोठ्या संखेने लावलेली असतात शनिवारी सुट्टी असल्याने मोठ्या संखेने भाविकांची वाहने या वाहनतळात होते. शनिवारी दुपारी अचानक MH41Bl9471या क्रमाकांच्या कार मधील इंजिन मध्ये आग लागली असता तिथे असणाऱ्या तरुणांनी पाण्याने  आग विझवली त्या मुळे वित्त व जिवीत हानी झाली नाही 

 
Top