धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर कारखान्याने दुसऱ्या हंगामातील सातव्या पंधरवड्याचा हप्ता संबंधित ऊस गाळपासाठी दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दि.७ फेब्रुवारी रोजी दिली.
धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या २०२४-२५ दुसऱ्या वर्षाच्या सातवा पंधरवडा ऊस पुरवठा केलेले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचे उसाचे बिल बँकेत वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे, अशा शेतकऱ्यांनी त्या बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे, असे आवाहन चेअरमन पाटील यांनी केले आहे.