धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न प्रथम गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर विज्ञान शिक्षक के. के. पाटील सरांच्या प्रेरणा प्रार्थना गीतांनी समारंभाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुस्तक, सन्मान चिन्ह, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे संख्येचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रमुख उपस्थिती संस्थेचे प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, फ्युचर हॉस्टेलचे मनोज कवडे, जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष गोपाळ शिंदे, सचिव दादासाहेब गवळी, वैजीनाथ खोसे, चैताली हॉस्टेलचे चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी केले. 10वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभुषा परिधान करून निरोप समारंभास उपस्थित होते. 10 वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक धनंजय वीर यांनी मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी.बी. गुंड, राजेंद्र जाधव, सुनील कोरडे सह 10 वीस अध्यापन करणारे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. सुत्रसंचालन सुर्यकांत पाटील यांनी केले. तर उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले. खाऊ वाटप करण्यात आला व आनंद उत्साहात 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभपूर्वक देण्यात आला.