धाराशिव (प्रतिनिधी)- सहकारी चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सावकारी पाशातून मुक्तता होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहकारी संस्थांनी आजपर्यंत प्रयत्न केला आहे. हा आर्थिकस्तर अधिक सक्षमपणे उंचावण्यासाठी सहकार हा एकमेव पर्याय आहे असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त नागपूर येथून शिर्डीकडे निघालेल्या सहकार दिंडीच्या धाराशिव येथील आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे बोलत होते. या दिंडीचे स्वागत आमदार कैलास पाटील यांनी केले. समर्थ हॉल येथे झालेल्या कार्याक्रम प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार एस. आर. तुपकर यांनी मार्गदर्शन केले. या दिंडीत शहरातील व जिल्ह्यातील विविध संस्थांचे चेअरमन, संचालक, सभासद, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सतीश दंडनाईक, हनुमंत भुसारे, सहाय्यक निबंध धनाजी काळे, डॉ.माधव अमबीलपुरे उपस्थित होते.
यामध्ये प्रशांत पाटील, डॉ. हर्षल डंबळ, मोहन सावंत, डॉ. दिग्गज दापके, पंकज पडवळ, बालाजी आममशेट्टी, जयश्री भुसारे, संजीवनी कपाळे, मुकीम सिद्दिकी, सुहास सुधीर सस्ते, पंडितराव जगदाळे, राजाभाऊ देशमाने, सतीश हिंगमिरे, महादेव केसकर, संतोष तौर, अजित गुंड, सत्यनारायण बोधले, मिलिंद खांडेकर आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीचे स्वागत झाल्यानंतर दिंडी मार्गात संस्थांनी आपल्या कार्यालयासमोर दिंडीत सहभागी झालेल्या व्यक्तींना चहापान केले. तर मान्यवरांचे ठिकठिकाणी स्वागत हे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि उपस्थितांचे आभार मधुकर जाधव यांनी केले.