धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय व कार्य तत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान, आत्मभान, ओळख, अस्मिता लढाऊपणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आज गेली चार शतक महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात आपल्या पराक्रमाची पताका फडकवित आहेत. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रभर स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्वराज्य सप्ताह साजरा करून महाराष्ट्राचे अस्मिता व स्वाभिमान यांच्याशी पक्ष जोडलेला आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना, मा.ना.श्री अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून शासन चालवण्याची प्रेरणा घेतो असा स्वराज्य सप्ताह साजरा करण्यामागील पक्षाची भूमिका आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष समि योद्दीन मशायक, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वगरे,सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असदखान पठाण,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, अण्णा बंडगर उपस्थीत होते.