धाराशिव (प्रतिनिधी) - त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील माता रमाई यांच्या स्मारकास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने पुष्पहार अर्पण करून दि.७ फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यात आले.
धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे जिल्हा नेते रवि माळाळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेंनिंबाळकर, युवा नेते रोहित पडवळ, विशाल गंगावणे, बंटी रोकडे, गिरीश माळाळे, विकास ढगे, नितीन लोंढे, तुषार माळाळे, अजय कटारे, संदेश माळाळे, शैलेश गडबडे, गौरव गायकवाड, उमेश माने, सागर माळाळे, आशिष सुरते आदी उपस्थित होते.