तुळजापूर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय भष्ट्राचार निमुर्लन संघर्ष समितीने मंगळवार दि. 25 रोजी तहसील कार्यालयात काही व्यक्तीसह महिलांनी अंगावरती ज्वलनशीली पदार्थ ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तहसिलदार अरविंद बोळंगे म्हणाले कि आपण केलेल्या समक्ष मागणी प्रमाणे महाराष्ट्र जमिन महसुल

अधिनियम 1966 चे कलम 48 व त्यानुसार केलेल्या नियमान्वये विटभट्टी साठी लागणारी माती व इतर गौण खनिज उत्खनन परवानगी देण्याचे व स्वामीत्व धनाची वसुली करण्याचे अधिकार या तहसिल कार्यालयास आहेत.बेकायदेशीर वीट भट्ट्या शील करण्याचेअधिकार नसल्याने या बाबतीत लातूर येथील महाराष्ट्र  प्रदुषण मंडळ,उपविभाग लातुर यांच्या कडे असल्याचे सांगितले.

तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्टी :तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता मात्र तसिलदार बोळंगे यांनी स्पष्टपणे लेखी पत्र दिल्यामुळे आत्मदहनाचे आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मागे घेतले.

 
Top