मुरुम( प्रतिनीधी)- दि.8 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे संपन्न झालेल्या 3 -या लोकसंस्कृती साहित्य संमेलनात आष्टी-कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिदास विधाते यांना रंगकर्मी प्रतिष्ठानचा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव, स्वागताध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रमेश अंबरखाने, सिने अभिनेता चंद्रशेखर सांडवे, रंगकर्मी प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड,सौ.डाँ.मंगल हरिदास विधाते,डाँ.सत्यजीत हरिदास विधाते आदि मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य हरिदास विधाते हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर येथे व्यवस्थापन परिषदे बरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगीरी बजावली आहे.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना त्यांना देण्यात आला आला आहे. हा मानाचा व प्रतिष्ठेचा दिला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कथाकार अंबादास केदार, प्रा.डाँ.सुधीर पंचगल्ले , लक्ष्मण बेंबडे, रसुल पठाण, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर,यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.