धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य कार्यालय नागपूर. येथे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश दत्ता बंडगर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्य आणि उद्देश आपण तळागळापर्यंत पोहोचवून संघटनेचा विस्तार करावा असे मार्गदर्शन डॉ तायवाडे साहेबांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडी प्रसंगी मराठवाडा विभागीय अध्यक्ष मा.श्री दिपकजी जाधव व नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री परमेश्वर राऊत उपस्थित होते.