कळंब (प्रतिनिधी)-  कळंब शहर व परिसरात कुणी कुठेही अतिक्रमण करून बांधकाम करते. तर कोणी पत्र्याचे शेड मारतात. याकडे ना बांधकाम विभागाचे लक्ष ना नगर परिषदेचे यामुळे अनेकांना याचा हकनाक त्रास सहन करावा लागतो. अशातच चक्क कळंब ढोकी रोडवर असणाऱ्या डिकसळ गावाजवळ असणाऱ्या पुलाजवळ कुणीतरी अज्ञातांनी बांधकाम केल्याची तक्रार खुद्द बांधकाम विभागाने पोलीस ठाण्यामध्ये केल्यामुळे कळंब शहरात बिल्डर लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे . 

याबाबत अधिकृत वृत्त असे की, कळंब ढोकी राज्य महामार्गावर (208) साखळी क्रमांक 1 / 600 मध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला पुलाजवळ कोणीतरी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. याची ते तातडीने दखल घेत बांधकाम विभागाने कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार  दिली आहे. कळंब ढोकी रोडवर डिकसळ येथून एक नाला ढोकी रोड वर या नाल्याचे पाणी पुढे प्रवाहित होण्यासाठी ढोकी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूल बांधण्यात आला आहे. या पुलाखाली मोठे सिमेंट पाईप टाकले आहेत. मागील काही वर्षापासून या नाद्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेला आहे. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी तुंबते. त्यामुळे हे पाणी लगतच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये जाते. त्यामुळे त्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याची मागणी सतत केली होती. सध्या पुलाखाली नाला बंद करून त्याखाली काँक्रेटीकरण करून, पाईप तोडून बेकायदेशीरपणे बांधकाम चालू आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अशी तक्रार बांधकाम विभागाकडे केल्यामुळे सदरील बांधकाम विभागाने सदर ठिकानचा पंचनामा करून पाहणी करून थेट कळंब पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस. एस. वायकर यांनी हि तक्रार दिली आहे. ही तक्रार दि. 31 जानेवारी रोजी दाखल केल्याने कळंब  शहरातील बिल्डर लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बांधकाम विभागाने व नगरपरिषदेने अशीच दखल घेतली गेली तर कळंब शहर व परिसरात अतिक्रमण रोखण्यास चांगलीच मदत होईल अशी मागणी शहरवासीयां मधून जोर धरत आहे.


 
Top