भूम (प्रतिनिधी)-  जुन्या सुवर्णकाळातील गाण्यांना नव्याने साज चढवणारा आणि संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद देणारा प्राईड इंग्लिश स्कूलचा ‌‘रेट्रो' वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन उद्योजक गोरख भोरे व सह्याद्री ब्लड बँकेचे शशिकांत करंजकर यांच्या हस्ते व अमर सुपेकर फैजान काझी यांच्या उपस्थितत दीप प्रज्वलन करून झाली.या कार्यक्रमात 1960 ते 1990 च्या दशकातील अजरामर हिंदी आणि मराठी गाण्यांवर प्राईडच्या बाल कलाकारांनी सुरेल सादरीकरण केले. लावणी, शेतकरी गीत, देशभक्ती गीत यांच्या सह विविध गाण्यावर मुले थिरकली. कार्यक्रमाची सुरुवात काळजाला भिडणाऱ्या मोहक गाण्यांनी झाली. त्यानंतर श्रोत्यांना स्वप्नील दुनियेत घेऊन जाणाऱ्या विविध युगांतील सदाबहार गाण्यांची लयलूट करण्यात आली. यामध्ये किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, साधना सरगम, यांची अजरामर गाणी रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवू लागली.

यावेळी, रंगीत प्रकाशयोजना आणि पारंपरिक वेशभूषेने रेट्रो थीमला अधिक मोहक स्वरूप प्राप्त झाले. प्रेक्षकांनी गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, टाळ्यांचा कडकडाट आणि गाण्यांच्या तालावर ताल धरत कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. हा अनोखा रेट्रो संगीत सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला. सूत्रसंचालन अलीम सर यांनी केले तर आभार भाग्यश्री डांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा सुपेकर, दिपीका टकले, माधुरी गरड, आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे यांच्यासह स्वप्नील सुपेकर, अक्षय बाराते, अमित सुपेकर, सरफराज मोगल आदींनी परिश्रम घेतले.

 
Top