नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विषयाच्या शिक्षिका डॉ. जयश्री घोडके यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे कौतुक होत आहे. काव्यमित्र संस्था पुणे व अपेक्षा मासिक परिवार पुणे यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण निम्मित सदाशिव पेठ पुणे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट साहित्यिका व उद्योजिका सौ चंद्रकला बेलसरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कोते, राजेंद्र बांदल, राजेंद्र सगर, दत्तात्रय उमे हे उपस्थित होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . डॉ जयश्री घोडके यांना यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील तीन पुरस्कार व राज्यस्तरीय तेरा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास दादा बोरगांवकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील पर्यवेक्षक प्रा. मोतीराम पवार महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 
Top