तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर मंदिर परिसरामध्ये बाल कामगार कार्यरत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव येथे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव, पोलिस स्टेशन तुळजापूर आणि युवा ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त पथकाने त्वरित कारवाई करत बालकामगारांच्या मुक्ततेसाठी धडाकेबाज मोहीम राबवली.  

सदर कारवाईत तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली. हे बालकामगार तुळजापूर मंदिर परिसरात काम करीत असल्याचे निदर्शनास आले. बालकामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

मुक्त केलेल्या बालकामगारांना तातडीने बालकल्याण समिती, धाराशिव यांच्यासमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार त्यांना पुढील काळजीसाठी बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.  

बालकामगार मुक्ततेसाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन, पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेली ही कारवाई स्तुत्य असून, भविष्यातही अशा स्वरूपाच्या मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.  


चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक 

बाल हक्कांचे उल्लंघन होत असल्यास किंवा बालकामगार आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाईल्ड हेल्पलाईनवर संपर्क करावा - संतोष रेपे - युवा ग्राम

 
Top