तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील आपसिंगा परिसरातील वरवटी गावाजवळ असलेल्या डोंगरात शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी  02.30वा अचानक डोगरावरच्या भागाला आग लागुन तो वणवा पेटत खालच्या बाजुला पसरला. माञ वेळीच अग्नीशमन दलाचे वाहन येवुन पेटत चाललेला वणवा विझवल्याने मोठा अनर्थ टळला. सदरील आग अडीच वाजता लागली व ती साडेतीन वाजता विझवली. यात दहा एकर क्षेञावरील पालापाचोळा, जनावर चारा माञ जळालाचे समजते. 

या बाबतीत अधिक माहीती अशी आपसिंगा ते वरवटी मधील भागात डोंगरवर आग लागुन तो वा-यामुळे पेटत खाली आला. माञ अग्निशमन दलाने वेळीच येवुन आग विझवल्याने आग वणवा पुढे जावु शकला नाही. यात शेती  वनखात्याचा जमिनीवर आग लागल्याची चर्चा आहे. या भागात फाँरस्ट जमिन शेकडो ऐकर असुन यात वृक्ष वनजीव मोठ्या प्रमाणात असल्याने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. उन्हाळा सुरु झाल्याने आगीचे वणवे पेटण्याची यापुढे शक्यता आहे. ही आग विझवण्यासाठी तुळजापूर नगरपरीषदचे फायरमन देविदास देवकते, मेघराज सिध्दगणेश, हर्षद क्षिरसागर, संजय बनसोडे यांनी प्रयत्न केले.

 
Top