तुळजापूर (प्रतिनिधी) -तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ अंतर्गत नाफेड मार्फत ऑनलाइन नोदणीकृत 1404 त्यापैकी 573 नोंदणीकृत शेतकऱ्यांचे एकूण 12951 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. असून उर्वरित 831 शेतकऱ्यांचा ऑनलाइन सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे.
तसेच दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाची खरेदी मुदत संपल्याने 831 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे शिल्लक असल्यामुळे व शासनाने मुदतवाढ दिल्यास उर्वरित ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करण्यात येईल. असे संघाचे चेअरमन सुनील जाधव यांनी सांगितले आहे.