तुळजापूर (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील बारावी परीक्षा केंद्राला राज्याच्या शिक्षण खात्यातील बालभारतीचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी भेट दिली आणि बारावी केंद्राचा आढावा घेतला. 

राज्य शासनातील बालभारतीचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ लातूरच्या सुरू असलेल्या बारावी परीक्षा केंद्राला भेट दिली आणि येथील कॉपीमुक्त वातावरण पाहून अत्यंत समाधान व्यक्त केले. मंडळ कार्यालयाने परीक्षा केंद्रासाठी ठेवलेले सगळे निकष या परीक्षा केंद्राने पूर्ण असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, शिक्षण विस्ताराधिकारी बालाजी एरमनवार, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे, केंद्र संचालक प्रा राजेंद्र खेंदाड, जिल्हा परिषद वरिष्ठ लेखा राजेंद्र झाडपिडे, प्रा. रामलिंग थोरात, प्रा. सत्यवान मुसळे, प्रा. शिवाजी राठोड. डॉ. सतीश महामुनी, शिक्षक नेते लालासाहेब मगर  यांची याप्रसंगी उपस्थिती होती. परीक्षा केंद्रातील एकूण 16 हॉलमध्ये शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी भेट दिली.  या निमित्ताने राज्य शासनाने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. याविषयी त्यांनी उपस्थित शिक्षकांना संदेश दिला. राज्य शासन शिक्षण विभाग कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या उपक्रमाचे फायदे देखील त्यांनी विशद केले.

 
Top