धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीने अल्पावधीत ग्राहकासोबत व्यवसायापलीकडचे नाते जपून ऋणानुबंध कायम केले असून, उत्कृष्ट व अखंड सेवा देणे, ग्राहकहित जपणे, यासाठी बँको व अवीज प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 200 ते 250 कोटी गटात उल्लेखनीय कामगिरीसाठी  प्रतिष्ठेचा ‌‘बँको ब्लू रिबन 2024' पुरस्कार रूपामाता अर्बन को. ऑप.क्रेडिट सो. लि. धाराशिवला बँको सहकार परिषद ॲम्बी व्हॅली, लोणावळा येथे  पुण्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान केला. हा पुरस्कार पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिवाजी बोधले, प्रशाशकीय व्यवस्थापक विशाल गुंड यांनी स्वीकारला. या वेळी अविज पब्लिकेशन चे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे, बँको चे डायरेक्टर अशोक नाईक व इतर पथसंस्थेचे सी.ई.ओ., अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेने आपल्या सभासदांना उत्कृष्ट सेवा देण्याचा कायम प्रयत्न केला असून, हा पुरस्कार सर्वांच्या कठोर परिश्रम व कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व कर्मचारी व सदस्य सभासद परिवाराचे रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी  अभिनंदन केले.


 
Top