कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभाग आणि रासेयोच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी योगदान दिले आहे. कुसुमाग्रज यांना 113 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दि.21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला, असे प्रतिपादन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले.
दि.1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून 1 मे दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' -दि. 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. 1966 पासून तो अंमलबजावणी करण्यात आली. विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस डॉ.अशोकराव मोहेकर (सचिव, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य डॉ.सुनिल पवार उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रा.डॉ.संजय कांबळे, उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, डॉ. के. डी. जाधव, प्रा.मधुकर माने, प्रा.डॉ.दादाराव गुंडरे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.व्ही.ताटीपामूल, प्रा.डॉ.दत्ता साकोळे, प्रा. डॉ. एन. एम. अदाटे, प्रा.डॉ.सुरेश वेदपाठक, प्रा.डॉ.बालाजी वाघमारे, प्रा.डॉ.एन.एम.अंकुशराव, प्रा.डॉ.के.डब्लू.पावडे, प्रा.डॉ. ईश्वर राठोड, प्रा.डॉ.संदीप महाजन उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधीक्षक हनुमंत जाधव, कमलाकर बंडगर, दत्तात्रय गावडे, अर्जुन वाघमारे, इकबाल शेख, संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.