भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रा. डॉ.तानाजी सावंत, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, कक्षप्रमुख मंगेश चिवटे,राज्यप्रमुख रामहरी राऊत, युवासेना राज्य समन्वयक नितीन लांडगे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्कप्रमुख सचिन मांजरे पाटील यांच्या पुढाकाराने मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी, प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन तालुकाप्रमुख पांडुरंग धस, उपस्थित होते. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांची काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली यात प्रथम बक्षीस पार्थ करडे, द्वितीय गायत्री मिसाळ तृतीय परी कोळेकर आदींनी सुंदर काव्यवाचन केले.विजेतेंना गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी व पांडुरंग धस यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य व पारितोषिक देण्यात आली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जान तो एवढ्या जगात माय मानतो मराठी कविता गाऊन मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी सर यांनी असे मत व्यक्त केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे प्रत्येक प्रांतातील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान असतो त्यामुळे आपणही आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असे पांडुरंग धस यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक पठाण सर,यांनी केले याप्रसंगी शिक्षक मोठे सर, प्रशिक्षक अरविंद मिसाळ शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष गणेश वारे, निलेश पाटील, धनंजय पाटील, अजित पाटील आदित्य घाडगे, संजय सावंत,उपस्थित ोते.आभार प्रदर्शन शिवसेना वैद्यकीय कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन तालुकाप्रमुख पांडुरंग धस यांनी मानले.