धाराशिव (प्रतिनिधी)- भव्य तिरंगा रॅलीचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदचे सीईओ मैनाक घोष जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधवआदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील सह अन्य उपस्थित होते. तब्बल पावणेतीन किलोमीटर लांब तिरंगा रॅलीचे 76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजन करण्यात आले होते या रॅलीत 7000 विद्यार्थी व आदर्श परिवाराच्या 17 शाखेने सहभाग नोंदविला होता.
या भव्य तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन झाली यावेळी तिरंगा रॅलीवर चार जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, युवा उद्योजक अभिराम पाटील तसेच जिल्हयातील सर्व शिवसेना पदाधिकारी व सर्व शाखेचे प्राचार्य विभागप्रमुख , कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हाधिकारी कार्यालय , बसवेश्वर चौक माणिक चौक या मार्गे भोसले हायस्कूलच्या मैदानावर विसर्जित झाली.