धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वरारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यास संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक उदयसिंह राजे, सुधीर पडवळ, राष्ट्रपती पदक विजेते युसुफ पठाण, अरुण बोबडे, के.वाय गायकवाड, एन. आर.गोरसे यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर एन.सी .सी व स्कॉऊड गाईडच्या चमूने ध्वजाला मानवंदना दिली. तर महेश पाटील यांचा बालचमूने देशभक्तीपर गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर प्राचार्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व थोडक्यात विशाद केले. यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, बी. बी. गुंड, राजेंद्र जाधव, धनंजय देशमुख, निखिलकुमार गोरे, प्रा. विनोद आंबेवाडीकर, प्रा. मोहनराव शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्वेक्षक राजेंद्र जाधव यांनी मानले.