धाराशिव (प्रतिनिधी) - येथील हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या 720 व्या उर्सनिमित्त एक तेरा सात ग्रुपच्यावतीने थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी गरजूंना चादरींचे वाटप आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते दि.18 जानेवारी रोजी करण्यात आले.
धाराशिव येथील ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उर्स सुरू झाला आहे. उर्स सुरू असलेल्या ठिकाणी शहर व ग्रामीण भागातील गरजवंतांना चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी एक तेरा सात ग्रुपचे संस्थापक शौकत शेख, अध्यक्ष अहेमद कुरेशी,अलीम पठान, मकबूल टकारी, फिरोज पठान, अयाज़ पठान, जुबेर शेख, फिरोज मुजावर, बबलू शेख़, हाशिम काज़ी, शाकिर शेख, मिलिंद अप्पा पेठे, नवनाथ डोंगरे, मेहराज भाई आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चादरीमुळे थंडीच्या दिवसात खऱ्या गरजवंतांना दिलासा मिळण्यास मोलाची मदत झाली आहे.