धाराशिव  (प्रतिनिधी) - येथील सीटीईटी युनिक क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सीटीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेत घवघवीत यश मिळवलेले आहे.

डिसेंबर 2024 मध्ये शिक्षक पदासाठी परीक्षा संपून त्याचा निकाल जाहीर झाला आहे. आज पर्यंत सीटीईटी युनिक क्लासचे 30 विद्यार्थी शिक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ते पात्र ठरले आहेत. या पात्र विद्यार्थ्यांपैकी 100 पेक्षा जास्त गुण घेतलेल्या 8 तर 90 पेक्षा जास्त गुण घेतलेल्या 22 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निखत कोतवाल (105 गुण), फैजा मोमीन पेपर पहिला (100 गुण) पेपर दुसरा (101 गुण), मोमीन जास्मिन (100 गुण), सिद्दीकी फकेहा (99 गुण), सानिया पटेल (91 गुण) आणि अनेक शिक्षकांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. यावेळी क्लासचे प्रमुख मार्गदर्शक अमजद शेख म्हणाले की, हे क्लास ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही पद्धतीने घेतले जात आहेत. या क्लास दरम्यान विद्यार्थ्यांना पेपर सोडवून घेऊन त्यांची चांगल्या पद्धतीची तयारी करून घेतली जाते. त्यासाठी दर 15 दिवसांनी मेगा मॅरेथॉनचे परीक्षेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे क्लासेसचे मार्गदर्शक अमजद शेख स्वतः पाच वेळा ही परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.

 
Top