तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील वडगाव काटी येथे पुण्यास गेलेल्या कुंटुंबाचे घर अज्ञात चोरट्याने फोडुन साडेआठ तोळे सोने व चांदी पैजन लंपास केल्याची घटना बुधवार दि. 8 जानेवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बाबतीत वडगाव काटी येथील चंद्रशेखर शिवाजी सपाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा प्रिंटींगचा व्यवसाय पुणे येथे असुन माझे वडगाव काटी येथे घर आहे. त्याठिकाणी माझी आई आधीमधे राहण्यास जाते. बुधवार दि. 8 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सपाटे यांच्या घराच्या परिसरात सामसूम असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटी फोडून चोरट्यांनी साडेआठ तोळ्याचे सोन्याचे दागिने व चांदीचे पैजण अंदाजे किंमत 3 लाख 11 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यानी चोरी केला. गुरूवारी सकाळी ही चोरीची घटना निदर्शनास आली. या प्रकरणी सपाटे यांनी तामलवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.


 
Top