भुम (प्रतिनिधी)- पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा वेळी त्यांची उणीव भरून काढतात ते आजी-आजोबा. आई-वडिलांपेक्षाही लहान मुलांना जवळचे वाटणारे आजी आजोबा आज त्यांचा दिवस. आजी-आजोबा खूप लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतात. आजी-आजोबाही त्यांच्या जीवनानुभवातून अनेक गोष्टी मुलांना शिकवतात आणि नातवंडांना जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ग्रँड पॅरेंट्स डे (Grandparents Day 2025) साजरा केला जातो. 

हा दिवस आजी-आजोबा आणि नातवंडांमधील बंध साजरा करतो. ज्याप्रमाणे मदर्स डे आणि फादर्स डे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ग्रॅड पॅरेंट्स डे देखील साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या आजी आजोबांबद्दल प्रेम व्यक्त करातत. त्यांना खुश ठेवण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील आजी आजोबांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात.खरंतर लहान मुलांच्या आयुष्यात आजी-आजोबांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण मुलांना जेव्हा बोलताही येत नाही तेव्हापासून आजी आजोबा त्यांच्या बरोबर असतात. त्यांना बोलायला, चालायला, कसं वागावं आणि कसं वागू नये या गोष्टी शिकवतात. त्याचप्रमाणे लहान मुलं अनेक गोष्टी मोठ्यांकडून शिकतात. त्यांचं अनुकरण करतात. लहान मुलांना संस्कार शिकवण्यापासून ते त्यांना भावनिक आधार देण्यापर्यंत आजी आजोबांचं मुलांच्या आयुष्यात फार मोलाचं स्थान आहे.

 Grand parents day व नवीन वर्ष  साजरा करण्यात आले. या वेळी उदघाटन श्री अलीम शेख सर व आजी आजोबा विक्रम गाढवे/ प्रभावती गाढवे, पोपट पंडित /शारदा पंडित, सुरेश बागडे /माणिनी बागडे हे उपस्थित होते तसेच या दिवसा निमित्त उपस्थित असलेले सर्व आजी आजोबा यांचे स्वागत करण्यात आले. मुला, मुलींचे भाषण, डान्स  विविध प्रकारचे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच जिंकणाऱ्या पालक स्पर्धकाला बक्षिसे देण्यात आली या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमा साठी शाळा व्यवस्थापक श्री हरिष धायगुडे शाळेच्या मुख्याध्यापिका शितल बावकर मॅडम व भाग्या जैन मॅडम सर्व शिक्षक यांनी अधिक परिश्रम घेतले.

 
Top